उभे राहूनी सर्व आता आरती करूया |
प्रेमभावे दत्ताला शरण जाऊया - 2 ॥ धृ ॥
पंचारती लावूनी आता स्वरूप पाहूया |
ब्रह्मानंदी लीन होऊनी आनंद भोगूया - 2 ॥१॥
उभे राहूनी सर्व आता आरती करूया |
प्रेमभावे दत्ताला शरण जाऊया - 2 ॥ धृ ॥
ऐसी विनंती करी आता सर्व जनासी |
दीप लावुनी हरि उभा दत्तचरणासी - 2 ॥२॥
उभे राहूनी सर्व आता आरती करूया |
प्रेमभावे दत्ताला शरण जाऊया - 2 ॥ धृ ॥
1 comments:
Nice work Truptiveera...
Ambadnya
Post a Comment