Tuesday 12 August 2014

About Swayanbhu Ganesh

॥ हरि: ॐ ॥
स्वयंभू गणेश
Swayambhu_Ganesh_at-Aniruddha_Gurukshetram
Swayambhu Ganesh

सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे पणजोबा (बापुंच्या आजी शकुंतलाबाई पंडित यांचे सासरे) श्री. अनन्त वामन पंडित हे श्रीकृष्णाचे परमभक्त होते. ते दररोज ब्राह्ममुहूर्तावर उठून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मन्त्राचा त्रिस्थळी जप १००८ वेळा करत असत.  त्यांचा निवास काशी क्षेत्री होता आणि ते दरवर्षी काशीहून द्वारकेस श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यास जात असत. १९३० साली काशी ते द्वारका ही यात्रा करताना त्यांना मध्यप्रदेशातील वन्यप्रदेशीय रस्त्यात स्वयंभू गणेशाची प्राप्ती झाली.
त्या वर्षी यात्रेत त्यांच्यावर अनेक संकटे येतात. ‘यात्रेत येणार्‍या विघ्नांचे कारण तुम्ही विघ्नहर्त्या गणेशाची उपासना करत नाही’ या विधानाचे उत्तर ते ठामपणे पुढीलप्रमाणे देतात
"भगवंत एकच आहे आणि त्या एकाचीच ही वेगवेगळी रूपे आहेत; त्यामुळे कृष्णभक्ती करताना गणपतीची उपासना आपोआप होतेच"
ते यात्रा पूर्ण करण्याच्या त्यांच्या निश्‍चयापासून जरासुद्धा ढळत नाहीत आणि त्यांच्या या दृढ भक्तिभावामुळेच पाषाणरूपात स्वयंभू गणेशाचे प्रकटन होऊन तो त्यांना प्राप्त होतो. बापुंच्या घरी असणार्‍या अशा या स्वयंभू गणेशाचे दर्शन दरवर्षी फक्त गणेशोत्सवातच श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे घेता येते आणि दरवर्षी या स्वयंभू गणेशासमोर श्रद्धावान भक्तिभावाने श्री गणपती-अथर्वशीर्षाचे पठण करतात.
॥ हरि: ॐ||

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys