Wednesday 13 August 2014

५. आरती करितो हनुमंताची


५.  आरती करितो हनुमंताची

आरती करितो हनुमंताची दासानुदास
हो देवा दासानुदास |
धडधडत येई धडधडत येई
घेऊनी द्रोणागिरी पर्वत  ॥ धृ ॥ 

एका क्षणे उडी मारूनी, समुद्र पालाणिला |
हो देवा समुद्र पालाणिला |
काया वाचा मने, काया वाचा मने,
राया श्रीराम स्मरिला  ॥ आरती ॥ १ ||

अष्टसिद्धी नौनिधी,  तुझे आज्ञांकित,
हो देवा तुझे आज्ञांकित |
निर्मोही तवचित्त,  निर्मोही तवचित्त,
साधो तू पूर्ण मुक्त  ॥ आरती ॥ २ ॥

दुष्टवासना, असत्य क्रीडा, कलियुगी संचरती |
हो देवा कलियुगी संचरती |
तुझे नाम स्मरता, तुझे नाम स्मरता |
वीरा क्षणात विरघळती  ॥ आरती ॥ ३ ॥

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys