Tuesday 12 August 2014

Aniruddha Gurukshetram Ganapati Punarmilap Procession


तिसर्‍या दिवशी पुनर्मिलाप मिरवणूक दुपारी ४-४.३०च्या  सुमारास सुरू होते आणि या सोहळ्यात जणू श्रद्धावान भाविकांचा महासागरच लोटतो. हजारोंच्या संखेने भक्त या सोहळ्यात सहभागी होतात. ’गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात बाप्पा फुलांनी सजवलेल्या वाहनावर विराजमान होतात आणि गणपतिसह अन्य एका वाहनातून भव्य शिवपिण्डीही प्रस्थान करत असते.

गरुडटके नाचवत, लेझिमसह लयबद्ध हालचाली करत आणि भक्तिमय गजरांवर नाचत श्रद्धावान पुनर्मिलाप मिरवणुकीत सहभागी होतात.
स्वत: परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत करतात. गणपतीबाप्पासोबत वाहनात असणारे श्रद्धावान शंख आणि घंटा यांचा मंगल नाद अखंडपणे करत असतात. त्याचप्रमाणे येथेही दर्शन घेणार्‍यांना प्रसाद दिला जातो. बापु स्वत: मिरवणुकीत श्रद्धावान मित्रांसह सहभागी होतात आणि बाप्पाच्या मिरवणुकीतील गजरांच्या तालावर प्रेमाने नाचतात. बापुंना भक्तिमय गजरांसह आनंद साजरा करताना पाहून श्रद्धावानही बेभान होऊन भक्तीच्या रंगात नाहत, नाचत आनन्द साजरा करतात. या मिरवणूक पथावर नऊ ठिकाणी श्रद्धावान श्रींचे औक्षण करतात. बापुंच्या घरच्या गणपतीचे औक्षण करण्यास मिळाल्याचा आनन्द या प्रसंगी त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत असतो.

साधारण रात्री साडे नऊच्या सुमारास पुनर्मिलाप सोहळा संपन्न होतो आणि त्यानंतर प्रत्येकाने  हॅपी होम येथे येऊन महाप्रसाद घेऊन जावा याबाबत बापुंचा सप्रेम आग्रह असतो. हसतमुख नन्दाईंकडून प्रसाद स्वीकारताना सर्वांचा शीण कुठल्याकुठे पळून जातो आणि बापु, नन्दाई व सुचितदादांना हरि ॐ म्हणून निघणार्‍या प्रत्येक श्रद्धावान मित्राच्या चेहर्‍यावर अम्बज्ञतेबरोबरच पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा स्पष्टपणे झळकत असते.

पावित्र्य हेच प्रमाण या बापुंनी घालून दिलेल्या मर्यादेचे पूर्णपणे पालन करून उत्सव कसा भक्तिभावमयपणे आणि प्रचंड उत्साहात साजरा करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा दर वर्षी साजरा केला जाणारा सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरचा  गणेशोत्सव!
 गणपती बाप्पा मोरया!

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys