Sunday 17 August 2014

७. लवथवती विक्राळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा | 
विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ 
लावण्यसुंदर मस्तकी बाळा | 
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझूळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा हो स्वामी शंकरा | 
आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा | 
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | 
विभूतीचे उधळण शितकंठ नीळा | 
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥
 जय देव... 

 देवी दैत्यी सागरमंथन पै केले |
त्यामाजीं अवचीत हालाहल उठिले ॥ 
ते त्वां आसुरपणे प्राशन केले | 
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥ 
जय देव... 

व्याघ्रांबर-फणिवरधर सुंदर मदनारि | 
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ 
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | 
रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥ ४ ॥
जय देव ... 


0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys